Skip to content
यिर्मयाह ४६:१-१२

यिर्मयाह ४६:१-१२

राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.
“तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही, आणि लढाईसाठी कूच करा!
घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!
मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.
“चपळ सैनिक पळू शकत नाहीत. वा बलाढ्य निसटून शकत नाहीत. उत्तरेकडे फरात नदीकाठी ते अडखळून पडत आहेत.
“नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखा हा कोण आहे?
इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’
अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!
१०
कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.
११
“हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.
१२
राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options