Skip to content
यिर्मयाह ४४:२४-३०

यिर्मयाह ४४:२४-३०

२४
मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!
२५
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!
२६
तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.
२७
इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.
२८
तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.
२९
“ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’
३०
याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options