यिर्मयाह ४३:११-१३
११
तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल.
१२
तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल.
१३
तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings