Skip to content
यिर्मयाह ४३:१-७

यिर्मयाह ४३:१-७

जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा
होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.
नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”
अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली.
यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले.
त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.
त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options