Skip to content
यिर्मयाह २५:२९-३१

यिर्मयाह २५:२९-३१

२९
माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’
३०
“म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील,
३१
हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options