Skip to content
यिर्मयाह २२:५-९

यिर्मयाह २२:५-९

परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”
कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.
मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन, प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील आणि त्या तोडून अग्नीत टाकतील.
“अनेक राष्ट्रातील लोक या शहराजवळून जातील आणि येथील विध्वंस पाहून ते एकमेकांना म्हणतील, ‘याहवेहने हे एवढे भव्य शहर का बरे नष्ट केले?’
आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options