Skip to content
यिर्मयाह २१:११-१४

यिर्मयाह २१:११-१४

११
“यहूदीयाच्या राजघराण्याला असे म्हण, ‘याहवेहचे वचन ऐका.
१२
दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.
१३
हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”
१४
याहवेह म्हणतात, तुमच्या कृत्याच्या योग्य शिक्षा मी तुम्हाला करेन. मी तुमच्या अरण्यामध्ये अग्नी पेटवेन तो तुमच्या सभोवती असलेले सर्वकाही जाळून टाकेल.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options