मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह २२:२४-३०

राजा कोन्याविरुद्ध संदेश (यहोयाखीन)

यिर्मयाह २२:२४-३०
२४
“मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,
२५
आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.
२६
तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.
२७
ज्या देशात परत येण्याची तू उत्कट इच्छा करशील, त्या देशात तू कधीच परतणार नाहीस.
२८
हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.
२९
अगे, हे भूमी, हे भूमी, हे भूमी तू याहवेहचे वचन ऐक!
३०
याहवेह असे म्हणतात: “कान्याह हा मनुष्य जणू अपत्यहीन आहे अशी नोंद करा, कारण त्याच्या जीवनात तो कधीही समृद्ध होणार नाही, त्याच्या मुलांपैकी कोणीही समृद्ध होणार नाही, त्याचा कोणताही वारस दावीदाच्या राजासनावर बसणार नाही, किंवा यहूदीया प्रांतावर राज्य करणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options