मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह २:२९-३७

अपराध नाकारणे व अंतिम इशारा

यिर्मयाह २:२९-३७
२९
“तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात.
३०
“मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.
३१
“या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?
३२
एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? तरी माझे लोक मला, असंख्य दिवसापासून विसरले आहेत.
३३
तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील.
३४
निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही
३५
तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे; परमेश्वर माझ्यावर रागावले नाहीत.’ परंतु मी तुमचा न्याय करेन कारण तुम्ही म्हटले, ‘मी पाप केलेले नाही.’
३६
तुम्ही आपले मार्ग सोडून पथभ्रष्ट का होता? अश्शूरने तुमचा आशाभंग केला तसाच इजिप्तही करेल.
३७
तुम्हीही आपले स्थान सोडणार आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options