यिर्मयाह १७:२३-२७
२३
परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते.
२४
याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात,
२५
तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील.
२६
तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील.
२७
परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”
Settings