मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह १५:१५-१८

यिर्मया प्रार्थना करून देवाला प्रश्न करतो

यिर्मयाह १५:१५-१८
१५
हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते; माझी आठवण ठेवा व माझी काळजी घ्या. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सूड घ्या, तुम्ही सहनशील आहात—मला दूर करू नका; विचार करा तुमच्यामुळे मला किती निंदा सहन करावी लागते.
१६
जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, कारण मी तुमचे नाव धारण केले आहे.
१७
मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.
१८
माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, जणू एखादा बिनपाण्याचा ओढा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options