Skip to content
याकोब १:१-१४

याकोब १:१-१४

१
परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,
२
माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना.
३
कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.
४
धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.
५
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.
६
परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे.
७
अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये.
८
असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.
९
दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा.
१०
परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.
११
जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.
१२
जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.
१३
मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत;
१४
परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options