मुख्य मजकुरावर जा
यशायाह ७:१०-१४

इम्मानुएलची खूण

यशायाह ७:१०-१४
१०
पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले,
११
“याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.”
१२
परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”
१३
तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का?
१४
म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options