मुख्य मजकुरावर जा
यशायाह ६६:२२-२४

सार्वकालिक अवस्था

यशायाह ६६:२२-२४
२२
“मी निर्माण केलेले नवे आकाश व पृथ्वी जसे टिकून राहतील,” याहवेह घोषित करतात, “तसेच तुमचे नाव व तुमची संतती सदासर्वकाळ टिकून राहील.
२३
एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्‍या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्‍या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात.
२४
“ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options