Skip to content
यशायाह ६६:१८-२१

उपासनेसाठी राष्ट्रांचे एकत्रीकरण

यशायाह ६६:१८-२१
१८
“यास्तव मी सर्व राष्ट्रांतील लोकांना आणि भाषिकांना एकत्र करेन, कारण त्यांनी कोणती योजना केली व कोणती कृत्ये केली आहेत, ते सर्व तिथे येतील व त्यांना माझे गौरव दिसेल.
१९
“मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.
२०
आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील.
२१
आणि परत येणार्‍या या लोकांमधून काहींची माझे याजक व लेवी व्हावे म्हणून मी त्यांची नेमणूक करेन,” असे याहवेह म्हणतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options