- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
देव समर्थ आहे, पण पाप विभक्त करते
यशायाह ५९:१-८
१
निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत.
२
परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.
३
कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.
४
कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.
५
ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.
६
त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते; त्यांनी जे बनविले त्याने ते स्वतःला पांघरू शकत नाहीत. त्यांच्या कृती दुष्टतेच्या कृती आहेत, हिंसात्मक कृती करणे हेच त्यांच्या हातात आहे.
७
पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
८
आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.
Settings