यशायाह ४२:५-९
५
परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात:
६
“मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,
७
जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन.
८
“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.
९
पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”
Settings