Skip to content
यशायाह ३२:१५-२०

आत्म्याद्वारे पुनर्स्थापना

यशायाह ३२:१५-२०
१५
परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल, ओसाड भूमी सुपीक होईल, आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.
१६
याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.
१७
शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.
१८
माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.
१९
जरी गारांनी अरण्याचा नाश होईल आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.
२०
तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options