मुख्य मजकुरावर जा
यशायाह २६:१२-१८

शांततेसाठी कबुली आणि प्रार्थना

यशायाह २६:१२-१८
१२
याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता; जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे.
१३
याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो. तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे,
१४
ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत. त्यांचे मृतात्मे उठत नाहीत. तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला; तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या.
१५
याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे; तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे. तुम्ही स्वतःसाठी गौरव प्राप्त केले आहे; तुम्ही देशाच्या सर्व सीमा वाढविल्या आहेत.
१६
हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.
१७
जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.
१८
आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, परंतु आम्ही वार्‍याला जन्म दिला. आम्ही देशात तारण आणलेले नाही, आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options