Skip to content
यशायाह २६:७-११

देवाच्या धार्मिक न्यायाची वाट पाहणे

यशायाह २६:७-११
नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.
होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.
रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.
१०
परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते, तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत. प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत.
११
याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे, परंतु ते पाहात नाहीत. तुमच्या लोकांबद्दलचा तुमचा आवेश त्यांना पाहू द्या व लज्जित होऊ द्या; तुमच्या शत्रूंना भस्म करण्यासाठी अग्नी राखून ठेवा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options