मुख्य मजकुरावर जा
यशायाह २६:१-८

यशायाह २६:१-८

त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल: आमच्याकडे एक भक्कम शहर आहे; परमेश्वर त्याचे तारण त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात.
वेशी उघडा जेणेकरून नीतिमान राष्ट्र, जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.
ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
याहवेहवर कायम भरवसा ठेवा, कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.
जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; ते त्याला भुईसपाट करतात आणि त्याला धुळीत टाकून देतात.
पावलांनो ते तुडवा— पीडितांच्या पावलांनो, गरिबांच्या पावलांनो.
नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.
होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options