Skip to content
यशायाह २४:१०-२३

यशायाह २४:१०-२३

१०
उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे; प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
११
रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत; सगळा आनंद दुःखात बदलला आहे, हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत!
१२
नगर उद्ध्वस्त झाले आहे, त्याच्या वेशी तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत.
१३
जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात, तशी देशांची अवस्था होईल, तशी या पृथ्वीची अवस्था होईल.
१४
ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील.
१५
म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा; समुद्राच्या बेटांवर, इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा.
१६
पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”
१७
पृथ्वीवरील सर्व लोकांनो, तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे!
१८
भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल, तर खड्ड्यात पडाल; खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल, तर तुम्ही सापळ्यात अडकाल, कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे, पृथ्वीचा पाया हादरला आहे.
१९
पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.
२०
पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.
२१
त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.
२२
त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल.
२३
चंद्राची त्रेधा उडेल, सूर्य लज्जित होईल; कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये, आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options