Skip to content
यशायाह १२:४-६

सार्वत्रिक साक्ष आणि स्तुतीचे आवाहन

यशायाह १२:४-६
४
त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.
५
याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; हे सर्व जगाला माहीत करून द्या.
६
सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.