यशायाह १०:१-३
१
त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,
२
गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.
३
दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?
Settings