होशेय ५:१-७
१
“तुम्ही याजकांनो, हे ऐका! अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! राजघराणे, ऐका! हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
२
बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे, मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
३
एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.
४
“त्यांची कर्मे त्यांना पुन्हा त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; ते याहवेहला ओळखत नाहीत.
५
इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो; इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात; यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो.
६
जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन याहवेहच्या शोधात फिरतील, ते त्यांना सापडणार नाही; कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत.
७
ते याहवेहशी अविश्वासू राहिले; ते अनौरस लेकरांना जन्म देतात. जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील, तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून टाकतील.
Settings