मुख्य मजकुरावर जा
इब्री २:९-१६

इब्री २:९-१६

पण फक्त काही काळ देवदूतांहून किंचित कमी असे केले होते, या येशूंना आता गौरवाने व सन्मानाने मुकुटमंडित केले आहे असे आपण पाहतो, कारण त्यांनी मरण सोसले, यासाठी की परमेश्वराच्या कृपेद्वारे त्यांनी प्रत्येकासाठी मरणाचा अनुभव घ्यावा.
१०
हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे.
११
जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही.
१२
ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”
१३
आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”
१४
आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.
१५
मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्‍यांची त्यांना सुटका करता येईल.
१६
हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options