मुख्य मजकुरावर जा
हाग्गय २:२०-२३

जरुब्बाबेल: देवाची निवडलेली मुद्रा

हाग्गय २:२०-२३
२०
त्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी याहवेहकडून हाग्गयला दुसऱ्यांदा वचन आले:
२१
“यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे.
२२
सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल.
२३
“ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options