- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
लोकांची अशुद्धता व देवाचा आशीर्वाद
हाग्गय २:१०-१९
लोकांची अशुद्धता व देवाचा आशीर्वाद
१०
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले:
११
“सर्वसमर्थ याहवेहचे असे म्हणणे आहे: ‘याजकांना विचार नियमशास्त्र काय म्हणते:
१२
तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.”
१३
मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”
१४
नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात.
१५
“ ‘आता तुम्ही आजपासून गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती.
१६
जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे.
१७
तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात.
१८
‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा:
१९
धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
हबक्कूक ३:१७
अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत,वचन १९ मधूनहबक्कूक ३:१८
तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.वचन १९ मधूनमलाखी ३:१०
तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही.वचन १९ मधूननीतिसूत्रे ३:९
तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर;वचन १६ मधूननीतिसूत्रे ३:१०
तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.वचन १६ मधूनमत्तय ६:३३
परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.वचन १९ मधूनस्तोत्रसंहिता १२८:१
प्रवाशांचे आराधना गीत. जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!वचन १९ मधूनस्तोत्रसंहिता १२८:५
याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.वचन १९ मधूनजखऱ्याह ८:११
पण आधी मी वागलो तसे मी आता या अवशिष्ट लोकांशी वागणार नाही,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.वचन १९ मधूनजखऱ्याह ८:१५
तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका.वचन १९ मधूनअनुवाद १५:१०
तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.वचन १९ मधूनउत्पत्ती २६:१२
इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले.वचन १९ मधून
अभ्यास टीप
Settings