हबक्कूक १:६-११
६
मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
७
ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत; ते स्वतःचाच कायदा बनवितात आणि स्वतःचाच मान राखतात.
८
त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;
९
हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.
१०
ते राजांचा उपहास करतात आणि अधिपतींची चेष्टा करतात. त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात; ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात.
११
वार्याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात— ते अपराधी लोक, ज्यांचे सामर्थ्य त्यांच्या दैवतांपासून आहे.”
Settings