Skip to content
उत्पत्ती ४७:१-४

उत्पत्ती ४७:१-४

योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”
त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले.
फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.”
ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options