उत्पत्ती ४६:२९-३०
२९
योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.
३०
मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.”