Skip to content
उत्पत्ती ३७:१२-१७

योसेफाला दोथान येथे पाठवले जाते

उत्पत्ती ३७:१२-१७
१२
योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते.
१३
इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.” योसेफ म्हणाला, “ठीक आहे.”
१४
याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्‍यातून पाठवले. आणि तो शेखेमास पोहोचला.
१५
तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?”
१६
योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?”
१७
तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.” तेव्हा योसेफ भावांच्या मागे दोथानला गेला आणि ते त्याला तिथे आढळले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options