मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती २२:३-१०

मोरिया पर्वताकडे प्रवास

उत्पत्ती २२:३-१०
अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.
तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले.
तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”
अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले,
इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”
अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.
परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले;
१०
मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options