Skip to content
उत्पत्ती २१:९-१५

उत्पत्ती २१:९-१५

९
परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले.
१०
तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.”
११
ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती.
१२
तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.
१३
त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
१४
दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.
१५
जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options