उत्पत्ती १०:११-२४
११
शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह
१२
व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
१३
इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
१४
पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.
१५
कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,
१६
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
१७
हिव्वी, आर्की, सीनी
१८
अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले
१९
आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
२०
वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
२१
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
२२
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
२३
अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
२४
अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.
Settings