एज्रा ८:३१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३१ दाखवत आहे.
२८
मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही, तसेच याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराला वाहिलेली स्वैच्छिक अर्पणे म्हणजे सोने चांदी व सोन्याचांदीची पात्रे याहवेह परमेश्वराला समर्पित केलेली आहेत.
२९
हे सर्व साठे याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवण्याकरिता तोलून यरुशलेमात नेतृत्व करीत असलेले याजक, लेवी व इस्राएलचे वडीलजन यांच्या स्वाधीन करण्याआधी यांचे काळजीपूर्वकरित्या रक्षण करा.”
३०
तेव्हा याजक आणि लेवींनी तोलून दिलेले चांदी, सोने व पवित्र पात्रे यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली.
३१
पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी अहवा कालव्यापासून तळ उठवून आम्ही यरुशलेमकडे निघालो. आमच्या परमेश्वराचा वरदहस्त आम्हावर होता आणि वाटेत त्यांनी शत्रू व लुटारू यांच्यापासून आमचे रक्षण केले.
३२
अशा तर्हेने आम्ही यरुशलेमला पोहोचलो, तिथे तीन दिवस विश्रांती घेतली.
३३
चवथ्या दिवशी उरीयाह पुत्र मरेमोथ याजकाच्या हाती, फिनहासाचा पुत्र एलअज़ार, येशूआचा पुत्र योजाबाद आणि बिन्नुईचा पुत्र नोअद्याह हे लेवी देखील त्याच्यासह असून रुपे, सोने व इतर मोलवान वस्तू यांचे परमेश्वराच्या मंदिरात वजन करून सोपविले.
३४
प्रत्येक वस्तूची संख्या व वजन मोजण्यात आले आणि त्यावेळी त्या वजनाची नोंद करण्यात आली.
Settings