Skip to content
एज्रा ६:११

एज्रा ६:११

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ११ दाखवत आहे.
एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.
स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.
१०
मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील.
११
कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल.
१२
ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.
१३
फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली.
१४
म्हणून यहूदी पुढार्‍यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्‍याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options