एज्रा ५:१३-१७
१३
“बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला.
१४
नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.
१५
त्याने त्याला सूचना दिली, ‘ही पात्रे घ्यावी आणि यरुशलेमच्या मंदिरात ठेवावी. परमेश्वराचे मंदिर पूर्वी होते त्याच ठिकाणी पुन्हा बांधले जावे.’
१६
“म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.”
१७
आम्ही विनंती करतो की बाबेलचे राजकीय दप्तर तपासले जावे व कोरेश राजाने परमेश्वराच्या मंदिराची यरुशलेममध्ये पुनर्बांधणी करावी अशी आज्ञा दिली होती की नाही हे पाहावे व मग आपली या प्रकरणी काय इच्छा आहे हे आम्हाला कळवावे.
Settings