Skip to content
एज्रा १०:१-९

एज्रा १०:१-९

१
परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.
२
मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.
३
आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.
४
तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”
५
तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.
६
मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.
७
मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.
८
इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.
९
तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options