मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ४६:१६-१८

अधिपतीच्या वतनाचे नियम

यहेज्केल ४६:१६-१८
१६
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल.
१७
तथापि, जर त्याने आपल्या वतनातून त्याच्या एखाद्या चाकराला काही भेट म्हणून दिले, तो चाकर स्वतंत्र होण्याच्या वर्षापर्यंत ती भेट ठेवू शकतो; मग ती पुन्हा राजपुत्राची होईल. राजपुत्राचे वतन केवळ त्याच्या मुलांच्याच मालकीचे आहे; ते त्यांचेच आहे.
१८
राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options