यहेज्केल ४५:७-९
७
“ ‘पवित्र प्रदेशाच्या भोवती व शहराची मालमत्ता याला लागून प्रत्येक बाजूची सीमा राजपुत्राची असेल. तिचा विस्तार पश्चिमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्वेकडून पूर्वेकडे असून त्याची लांबी पश्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत एका गोत्राच्या भागाच्या समांतर अशी असेल.
८
ही भूमी इस्राएलमध्ये राजपुत्राचे वतन असेल. आणि यापुढे माझे राजपुत्र माझ्या इस्राएली लोकांवर अत्याचार करणार नाहीत, तर इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार देशाचे वतन घेऊ देतील.
९
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Settings