यहेज्केल ४५:१३-१७
१३
“ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग.
१४
बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).
१५
इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१६
देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.
१७
हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.
Settings