मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल २८:२४-२६

इस्राएलची पुनर्स्थापना व सुरक्षितता

यहेज्केल २८:२४-२६
२४
“ ‘इस्राएली लोकांना काटेरी झुडूपांसारखे आणि धारदार काट्यांप्रमाणे द्वेष्ट वृत्ती असलेले शेजारी आणखी नसतील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.
२५
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील.
२६
ते तिथे सुरक्षित राहतील आणि घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. ते सुरक्षित असतील जेव्हा मी त्यांचे शेजारी ज्यांनी माझ्या लोकांची चहाडी केली त्यांना मी दंडाने पिडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options