Skip to content
यहेज्केल २७:२१-३१

यहेज्केल २७:२१-३१

२१
“ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
२२
“ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.
२३
“ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.
२४
तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
२५
“ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.
२६
तुझ्या वल्हेकर्‍यांनी तुला खोल समुद्रात आणले. परंतु त्या खोल समुद्रामध्ये पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल.
२७
तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.
२८
जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.
२९
सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्‍यावर उभे राहतील.
३०
आपला आवाज उंच करून तुझ्यासाठी हेल काढून रडतील; ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील व राखेत लोळतील.
३१
तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून गोणपाट नेसतील. ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने तुझ्यासाठी रडतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options