Skip to content
यहेज्केल २४:२०-२७

यहेज्केल २४:२०-२७

२०
तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२१
इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील.
२२
आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही.
२३
तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल.
२४
यहेज्केल तुमच्यासाठी एक चिन्ह असा आहे; जसे त्याने केले तसेच तुम्हीही करा. हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.’
२५
“आणि तू, हे मानवपुत्रा, ज्या दिवशी मी त्यांचे बलवान दुर्ग, त्यांचा हर्ष आणि गौरव, त्यांच्या डोळ्यांचा आनंद, त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्यांची मुले व मुली सुद्धा काढून घेईन;
२६
त्या दिवशी एक फरार झालेला तुम्हाला वर्तमान सांगण्यास येईल.
२७
त्यावेळी तुझे तोंड उघडेल; तू त्याच्याशी बोलशील, आणखी शांत बसणार नाही. याप्रकारे तू त्यांच्यासाठी एक चिन्ह असा असशील, आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options