Skip to content
यहेज्केल २१:१-७

इस्राएलविरुद्ध देवाची न्यायाची तलवार

यहेज्केल २१:१-७
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, यरुशलेमविरुद्ध आपले तोंड कर आणि पवित्रस्थानाविरुद्ध संदेश दे. इस्राएल देशाविरुद्ध भविष्यवाणी कर.
आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन.
कारण मी नीतिमानास व दुष्टास छेदून टाकणार आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाविरुद्ध माझी तलवार म्यानातून उपसली जाईल.
तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’
“म्हणून मानवपुत्रा, आक्रोश कर! भग्न हृदयाने व कष्टाने त्यांच्यासमोर उसासे टाक.
आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options