Skip to content
यहेज्केल १८:५-१८

यहेज्केल १८:५-१८

“समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.
तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.
तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.
व्याजावर कोणाला उसने देत नाही त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.
तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१०
“समजा त्याच मनुष्याचा एक हिंसक मुलगा आहे, जो रक्तपात किंवा त्यासारख्या इतर गोष्टी करतो
११
(जरी त्याच्या पित्याने त्यापैकी एकही केले नव्हते): “तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खातो. तो आपल्या शेजार्‍याची पत्नी भ्रष्ट करतो.
१२
गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. तो इतरांना लुटतो. उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. तो अमंगळ कृत्ये करतो.
१३
तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो. असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील.
१४
“परंतु समजा, या मनुष्याला एक मुलगा आहे जो आपला पिता करीत असलेली ही सर्व पापे पाहतो आणि जरी तो पाहतो, तरी त्या गोष्टी तो स्वतः करीत नाही:
१५
“तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याची पत्नी भ्रष्ट करीत नाही.
१६
तो कोणावर अत्याचार करीत नाही किंवा उसने देण्यासाठी गहाण ठेवून घेत नाही. तो लुटत नाही तर भुकेल्याला आपले अन्न देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.
१७
तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही. तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो. तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल.
१८
पण त्याचा पिता स्वतःच्या पापामुळे मरेल, कारण त्याने फसवणूक केली, आपल्या भावाला लुटले आणि जे चुकीचे ते आपल्या लोकांत केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options