मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल १३:१०-१६

न गिलावा केलेली भिंत

यहेज्केल १३:१०-१६
१०
“ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात,
११
म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.
१२
जेव्हा भिंत कोसळेल तेव्हा, “तुम्ही दिलेला चुन्याचा लेप कुठे आहे” असे लोक तुम्हाला विचारणार नाहीत काय?”
१३
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल.
१४
तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
१५
याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले,
१६
इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options