Skip to content
यहेज्केल १३:१-९

यहेज्केल १३:१-९

याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका!
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो!
हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागेतील कोल्ह्यांसारखे आहेत.
याहवेहच्या दिवशी युद्धात टिकून उभे राहावे म्हणून इस्राएलच्या लोकांसाठी भिंतींच्या खिंडारांना दुरुस्त करावयाला तुम्ही वरती गेला नाही.
त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात.
तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिले नाही काय आणि मी बोललो नाही तरीही, “याहवेह हे जाहीर करतात,” असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही खोटा शकुन उच्चारला नाही काय?
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options