Skip to content
निर्गम ५:६-१४

फारो इस्राएलच्या मजुरीचे ओझे वाढवतो

निर्गम ५:६-१४
६
त्याच दिवशी फारोहने इस्राएलावर नेमलेल्या मुकादमांना व अधिकार्‍यांना हुकूम दिला:
७
“यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे.
८
तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत.
९
त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”
१०
तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही.
११
तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.”
१२
तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले.
१३
मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.”
१४
फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्‍यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options